Alert India

  • 0
Alert India

Alert India

Category : Blog , Front Page , Jobs

सावधान !!!

सध्या परिस्थिती पाहता पुन्हा कडक लोकडाऊन होण्याची शक्यता आहे. लोकडाऊन या पर्यायाव्यतिरिक्त आवश्यक उपाय योजना करण्यास सरकार मात्र दुर्लक्ष करित आहे. सध्या राज्य सरकार जात, धर्म व आरक्षणाच्या राजकारणात तर केंद्र सरकार आपल्या पक्षाच्या शक्ती प्रदर्शनात कमी पडू नये म्हणुन व्यस्त आहेत. भारतातील परिस्थितीची जागतिक पातळीवर दाखल घेतली जात आहे परंतु राजकीय व विरोधी पक्ष नेते आपापल्या पक्षाचे हित जपण्यात व्यस्त आहेत. निवडणुकी दरम्यान हेच कार्यकर्ते घरोघरी मत मागणीस जाऊ शकतात, त्या वेळी त्यांच्याकडे प्रत्येक नागरिकाचा डेटा देखील असतो. मग लसीकरण करण्यामागे उदासीनता का ? का आज नागरिकांना एकत्रिक बोलावले जात आहे ? बरं त्यातही नियोजन नाही. पुरेशी उपलब्धता नाही....

लसीकरणाच्या नावाखाली नागरिक बाहेर पडत आहे, याला जवाबदार कोण ? लसीकरणाच्या नावाखाली नागरिक एकत्रित येत आहेत मग सरकार स्वतः कलम १४४ चे उल्लंघन नाही करित आहे का ???

यांना जाब कोण विचारणार ??? (Article in English)

यात कुठेतरी आपणही जवाबदार आहोतच की... माणुस म्हणुन आपल्यातली माणुसकीचा आपणच घोट घेत आहोत. कालच नागपुरमध्ये पेशन्टच्या नावाने उपलब्ध करण्यात आलेल्या रेमडेसिव्हीरचा काळा बाजार करण्यात आला व पेशन्टला भलतेच इंजेक्शन देण्यात आले. यात महिला डॉक्टरचा देखील समावेश . काय म्हणायचे याला ??

आज घरोघरी प्रत्येकजण केक, बिर्याणी व इतर जंक फुड बनवून स्टेट्स ठेवत आहोत. एकाचे स्टेट्स पाहुन दुसराही तेच करतोय. कोणी तुळशीचा काढा, हळदीचे दुध बनवल्याचे स्टेट्स ठेवतंय का ?? ज्या गोष्टी प्रेरित करतील अश्या करण्याऐवजी आपण प्रत्येकजण नकळतपणे वेगळ्याच मार्गी लागलो आहोत. आयुर्वेदावर थोडीशीजरी माहिती मिळवुन काळजी घेतली तर कोरोनाच काय आहेत ते पण व्याधीपण दुर होतील.

आज प्रत्येक नागरिकाचे व्यवसाय, नोकरी, उत्पन्नाचे मार्ग धोक्यात आहेत. अभ्यास, श्रम व आपल्याती असलेल्या कलेतुनच काही करण्या ऐवजी सहज उत्पन्न मिळेल (Easy Money) या मागे लागलो आहोत. सोशल मीडियावर घरी बसुन कमवा (Work From Home)अशी पोस्ट टाकली कि हजारो कमेंट्स येतात मग वेगवेगळ्या मार्गाने पैशे आकारून पुन्हा फावणुकीचे प्रकार होत आहेत. आपण फसलो कि आपण दुसऱ्याला फसवत आहोत. आपल्यातील गुण, कला स्वतः ओळखुन काही नवीन करण्याची जिद्द आपल्यात आली पाहिजे. काय करणार याचे उत्तर आपणच शोधले पाहिजे. (Article in English)

आपल्या रोजच्या जीवनात आपण प्रत्येक जण काही गोष्टीवर आपल्या पद्धतीने योग्य मार्ग काढतो अथवा पर्याय शोधतो. प्रत्येकाचे कौशल्य वेगळे वेगळे असते. याच पर्यायाचा दुसर्यास देखील फायदा होऊ शकतो. योग्य विचार केल्यास त्यातुनच व्यवसायाचा नवीन मार्गही सापडेल. प्रत्येकासोबत दिवसातुन एकदातरी असे काही वेगळे घडत असते फक्त आपण ते ओळखले पाहिजे व त्यातुन नवीन संकल्पना घडविली पाहिजे.

स्किलिंग इंडिया स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्ड धारकास आवाहन करित आहोत. आपले कर्तव्य म्हणुन प्रत्येक नागरिकात राजकारणा ऐवजी सामाजिक भावना निर्माण करू. हि पोस्ट प्रत्येकापर्यंत पोहोचऊ व प्रत्येकाचे मत जाणुन घेऊ. स्वयंरोजगार व व्यवसाय मार्गदर्शनाबद्दल योग्य व अधिक माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचऊ. आपले देखील मत अपेक्षित आहे. (Article in English)

आपले मत मांडण्याकरिता क्लिक करा

Register Smart Employment Card

Register your Smart Employment Card and get Life Time Career and Job Support.

Benefits

  1. Life Time Support
  2. Apply Verified Government & Private Exmployment Exchange Jobs.
  3. Competative Exam guidelines and preparation
  4. Learn Free basic courses, Industry and Technology Updates
  5. Employment and Self Employment Assistance


Leave a Reply