Work From Home

  • 0
Work From Home

Work From Home

Category : Blog , Front Page , Jobs

सुवर्ण_संधी !!!…. दिवसातले फक्त दोन तास काम करुन दरमहा पंचवीस ते पन्नास हजार रुपये कमवा…… कोणत्याही डिग्रीची गरज नाही. कंप्युटर, लॅपटॉप, मोबाईल वापरुन डाटा एंट्रीचे काम करा आणि महिना पन्नास हजार रुपयांपर्यंत कमाई करा… उत्पन्नाचा एकच मार्ग आहे ? सावधान !!! – आपले फेसबुक अकॉउंट असल्यास हजारो कमवा !!!

#workfromhome #easymoney #सुवर्ण_संधी #parttimework #workparttime #earnfromhome

सध्या लॉकडाऊनच्या बिकट परिस्थितीत तुम्ही आश्या प्रकारचा आशय असलेल्या अनेक जाहिराती पाहात असाल. आज प्रत्येकास नक्कीच उत्पन्नाचा दुसरा देखील मार्ग असावा अशी अपेक्षा असते.. मग अश्या जाहिरातीची आपणास भुरळ पडते व लगेच त्यास आपण प्रतिसाद देतो. पण खरंच या जाहिराती खऱ्या असतात का त्यातुन काही लुबाडले जाते…. हो, सर्वेच नाही, पण ९९ टक्के जाहिराती ह्या फसव्याचं असतात.

*कसं फसवलं जातं पहा – संपुर्ण वाचा व इतरांना शेअर करा *
😡😡😡😡😡

गुगलवर Data entry job असं काही तरी search केलं की तुम्हाला message येईलच. त्या link वर क्लिक केले की एक वेबसाइट open होईल. तिथे ज्या कंपनीची जॉब vacancy आहे ती link दिसेल. तिथे कामाचे स्वरुप दिसेल. Printed pages वरील मजकूर फक्त आहे तसा type करायचा असतो. असंच काहीतरी सोपं काम असतं.

जर तुम्हाला काम आवडले तर तुम्ही form भरुन द्यायचा. कामाचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होण्यासाठी तुमच्या बॅंक खात्याचा तपशील द्यावा लागतो. तुमचा postal address तर हवाच. शिवाय तुमचा एक फोटो अपलोड करावा लागतो. एका कागदावर तुमची सही करुन त्या सहीचा फोटो काढून png formate मध्ये upload करावा लागतो. फॉर्म submit करुन तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं की, काम झालं.

मग तुम्हाला एक काम दिले जाते. आठ दहा पाने आठ दिवसात टाईप करुन द्यायची असतात. तुम्ही ती तीन दिवसातच टाईप करून पूर्ण करुन देता. मग तुमचं work त्याची accuracy तपासली जाते. 90% accuracy नसेल तर ते reject केलं जातं. तुम्ही पुन्हा ते 100 % accurate करुन सबमिट करता. पुन्हा ते reject होते. तुम्ही multiple devices use केले आहेत असे कारण दिलेले असते. तुम्ही submit केलेलं काम प्रत्येकवेळी reject होत राहतं. शेवटी वैतागून तुम्ही ते काम सोडून देता, किंवा मला तुमचे काम नको आहे असे त्या कंपनीला कळवता….

आता इथून पुढे खरा खेळ सुरू होतो. तुम्ही भरलेला फॉर्म, माहिती व सही याचा खरा वापर करायला सुरवात होते.

1. सर्व प्रथम आपण भरलेली आपली पर्सनल माहिती वेगवेगळ्या मार्केटिंग कंपनीस विकली जाते. एका व्यक्तीची माहिती साधारणतः २० ते १०० रुपये पर्यंत देखील विकता येऊ शकते. आपण वेगवेगळ्या कंपनीमधुन आलेले मार्केटिंग कॉल्स अनुभवले असतीलच. मग तुमची हि माहिती त्याच्याकडे कशी जाते ????

2. क्रेडिट कार्ड व इन्शुरन्सचे मार्केटिंग करिता तुमचा डेटा अधिक भावात विकत घेतला जातो. बरं हा डेटा एकाच नाही, तर अनेक कंपन्यांना विकला जातो. तुम्हाला पण अचानक एव्हडे कॉल्स कुठुन आले याचा अनुभव असेलच….

3. आपण भरलेल्या फॉर्म मध्ये अनेक अटी व नियम असतात ज्या आपण पुर्ण कधीच वाचलेल्या नसतात. एके दिवशी तुम्हाला कंपनीच्या लॉयरचा फोन येतो. तुम्ही कंपनीशी केलेलं contract break केलेले आहे म्हणून, तो तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देतो. तुम्हाला दिलेलं कंपनीचं काम तुम्ही वेळेत आणि accurate करुन न दिल्याने कंपनीचे नुकसान झालेले आहे त्याची नुकसान भरपाई रक्कम तो मागतो. एक तर काम पूर्ण करुन द्या, किंवा कंपनीचे झालेले नुकसान तरी भरुन द्या अशी त्या लॉयरची मागणी असते. तुम्ही एकतर कायदेशीर कारवाईला घाबरुन तीस चाळीस हजार भरुन टाकता किंवा मग सपशेल दुर्लक्ष तरी करता.

4. बरं जे घाबरुन पैसे भरतात त्यांना अजुन अडचणींना सामना करावा लागतो. कंपनीसोबत तुम्ही केलेले agreement तुम्हाला पाठवले जाते. त्यात अनेक अटी व शर्ती असतात. तुम्ही जर मध्येच काम सोडून दिले तर अकरा महिन्याचे पैसे तुम्हाला कंपनीला द्यावे लागतील अशी एक शर्त तुम्ही मान्य केलेली असते. कंपनी तुमच्याकडे पाच ते दहा लाखाची मागणी करते. तुम्ही अ‍ॅग्रीमेंट लिहून दिलेले नसते पण तुमच्या सहीचा व फोटोचा वापर करून हे अ‍ॅग्रीमेंट कंपनीने अस्तित्वात आणलेले असते…

कायदेशीर कारवाईच्या भितीने तुम्हाला पैसे भरावे लागतात किंवा मग तुम्ही दुर्लक्ष करता..

5. मग आता तुमच्या नावे दाखल केलेल्या F. I. R. ची कॉपी तुम्हाला पाठवली जाते. 420 सह आयपीसी मधली Break of contract ची कलमे लावून कुठल्यातरी दूरच्या शहरात तुमचे विरुद्ध एफ आय आर दाखल केलेला आहे असे तुम्हाला दाखवले जाते. कंपनीचा लॉयर तुम्हाला सतत तडजोड करुन लम सम अमाऊंट भरा मी प्रकरण मिटवून टाकतो असा तगादा लावत असतो. तुम्ही वैतागून निम्मी आर्धी रक्कम भरुन प्रकरण मिटवून टाकता. चार पैसे मिळवण्याच्या नादात तुम्ही कंपनीलाच पैसे देऊन मोकळे होता.

हे प्रकरण संपता संपत नाही, कारण तुम्ही दिलेल्या इलेक्ट्रॉनिक सिग्नेचरचा ते कुठेही कसाही गैरवापर करुन ते तुम्हाला लुबाडू शकतात.
Easy Money च्या मोहापोटी तुम्ही या असल्या जाळ्यात अडकलात तर नुकसानाव्यतिरिक्त काहीच हातात लागत नाही…. या बाबत आपण सायबर सेलकडे तक्रार करू शकता.

Easy Money च्या नादी लागू नका. सोप्या कामाचे कुणीही एवढे पैसे देत नाही. तुम्हाला महिना पन्नास हजार देण्यापेक्षा दहा पंधरा हजारात ते एखादा टायपीस्ट कामाला ठेवू शकत नाही का…?

फ्रॉड्स चे स्वरूप प्रत्येक वेळी नवीन असेल. पण सगळ्यात एकच समान असते ते म्हणजे अमिष. या अमिषाला बळी पडायचे की नाही..? हे तुमच्याच हातात असते… आज स्किलिंग इंडिया तर्फे अश्या सर्व जाहिरातीची माहिती मिळवली जाते व योग्य अश्याच कंपनीची अथवा कामाची माहिती स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्ड धारकांसाठी उपलब्ध करून दिली जाते. आपणास खरंच अश्या कामाची आवश्यकता असल्यास स्किलिंग इंडिया मार्फत आपले स्मार्ट एम्प्लॉयमेंट कार्ड नोंदणी करून घ्यावी.

तेंव्हा सावध रहा… काळ मोठा कठीण येणार आहे…

काळजी घ्या, सावध राहा… व इतरांना शेअर करा…

Register Smart Employment Card

  1. Life Time Support
  2. Apply Verified Government & Private Exmployment Exchange Jobs.
  3. Competative Exam guidelines and preparation
  4. Learn Free basic courses, Industry and Technology Updates
  5. Employment and Self Employment Assistance


Leave a Reply