Lockdown 5
Category : Blog , Front Page
सकारात्मक राहा -- सुरक्षित रहा -- आनंदी राहा
एका कैद्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, तेव्हा काही वैज्ञानिकांनी ह्या कैद्यावर काही प्रयोग करण्याचे ठरविले व त्यास मान्यताही मिळाली. त्या कैद्याला सांगितलं गेलं, की तुला फाशी न देता विषारी कोब्रा डसवून मारणार आहे.
त्याच्या समोर एक मोठा विषारी साप आणला गेल्यानंतर त्या कैद्याचे डोळे बंद करून त्यास खुर्चीला बांधले. आणि त्याला साप डसवून नाही, तर दोन सेफ्टी पिन्स टोचण्यात आल्या आणि काय आश्चर्य त्या कैद्याचा दोन सेकंदात मृत्यू झाला.
पोस्टमॉर्टेम केल्यानंतर समजलं, की कैद्याच्या शरीरात सापाच्या 'व्हेनम'सदृश्य विष आहे. आता हे विष कुठून आलं, की ज्यामुळे कैद्यांचा जीव गेला? ते विष मानसिक धक्क्यामुळे त्याच्या शरीरानेच उत्पन्न केलं होतं!
आपल्या प्रत्येक संकल्पामुळे पॉजिटिव्ह किंवा निगेटिव्ह एनर्जी उत्पन्न होते व त्यानुसार आपल्या शरीरात Hormones उत्पन्न होतात. ९०% आजारांचं मूळ कारण नकारात्मक विचारांनी उत्पन्न होणारी ऊर्जाच आहे.
आज कोरोना मुळे प्रत्येक मानवी मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, कोरोना पाॅजिटीव्ह असणारे ५ वर्षाच्या मुलापासुन ते ८० वर्षा पेक्षा जास्त वयस्कर सुद्धा निगेटिव्ह झालेत. त्यामुळे घाबरू नका. आकडेवारी वर जाऊ नका कारण आर्ध्या पेक्षा जास्त लोक व्यवस्थित आहेत, आणी मृत्यु पावणारे फक्त कोरोना या आजारामुळे गेलेत असे बिलकुल नाही, त्यांना इतर पण आजार होते. त्यामुळे ते याचा मुकाबला करू शकले नाही. लक्षात ठेवा कोरोनामुळे आतापर्यंतचे सर्व रुग्ण हाॅस्पीटल मध्येच मरण पावलेत. यांचे प्रमुख कारण काही हाॅस्पिटल मधील वातावरणही असु शकते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनातली भीती. कोरोना हा सर्दी, खोकला, ताप यासारखाचआजार आहे.
आज मनुष्य आपल्या चुकीच्या विचारांचा भस्मासुर बनवून स्वत:चा विनाश स्वत:च करत आहे.
आपले विचार सदैव सकारात्मक ठेवा आणि आनंदी रहा.
माणूसकी जपा - काळजी घ्या - सुरक्षित रहा