
गाय आणि म्हशीच्या दुधातील फरक
Category : Blog , Front Page
म्हैस आपल्या रेडकूपासून दूर पाठ करून बसते, जरी रेडकु जवळ कुत्रा आला तरी ती त्याला वाचवणार नाही. या उलट गाईच्या कालवडीकडे अनोळखी व्यक्ती जरी आला (वाघ असला तरीही), गाय जीव देईल, पण ती जिवंत असताना, ती आपल्या बाळावर आच येऊ देणार नाही. त्यामुळेच गायीच्या दुधात आपुलकी गुण मुबलक आहे.
म्हशीला घाण आवडते, चिखलात देखील बसेल. पण गाय शेणावरही बसणार नाही, तिला स्वच्छता फार आवडते.
म्हशीला घरापासून २ किमी अंतरावर तलावात सोडून या, ती घरी येऊ शकत नाही. तिची स्मरणशक्ती शून्य आहे. गाईला घरापासून ५ किलोमीटर अंतरावर सोडा. तिला घरी येण्याचा रस्ता सांगावा लागत नाही, ती बरोबर येणार. गाईच्या दुधातहि तितकीच स्मरणशक्ती तीक्ष्ण असते.
दहा म्हशी बांधा आणि त्यांच्या रेडकूंना २० फूट दूर सोडा, एकही रेडकू आपल्या आईला ओळखू शकत नाही. पण गो शाळांमध्ये दिवसभर गाई, वासरांना स्वतंत्र शेडमध्ये ठेवले जाते, संध्याकाळी जेव्हा सर्व वासरे आईला भेटतात, तेव्हा सर्व वासरे (हजारोच्या संख्येने) आपापल्या आईला बरोबर ओळखतात आणि आपल्याच आईकडे जातात, हाच जिव्हाळा गाईच्या दुधात आहे.
म्हशीचे दूध काढल्यावर म्हैस सर्व दूध देते, पण गाय थोडे दूध शिल्लक ठेवतेच आणि जेव्हा ती आपली वासरे दूध प्यायला येतात तेव्हा ती ते शिल्लक दूध पाजते. हाच आईचा मातृत्व गुण गाईत आहे, जो म्हशीमध्ये नाहीत.
रस्त्यावर मुले खेळत असतील आणि म्हैस धावत आली तर ती नक्कीच मुलांच्या अंगावर पाय ठेवते. पण गाय आली तर ती मुलांच्या अंगावर कधीच पाय ठेवत नाही. म्हशीला सूर्य आणि गरमी सहन होत नाही. तर गाय मे जून मध्येही उन्हात बसू शकते. म्हशीचे दूध तामसिक असते. तर गाईचे दूध सात्विक असते.
म्हशीच्या दुधात आळस भरलेला असतो. तिचे पिल्लू दिवसभर भांग खाल्ल्यासारखे पडून असते. जेव्हा दूध काढण्याची वेळ येईल तेव्हा मालक त्याला उचलतो. पण गायीचे वासरू एवढी उडी मारेल की तुम्ही दोरी सोडू शकणार नाही एव्हडी चपळता असते.
लोक म्हशी खरेदीसाठी लाखो रुपये खर्च करतात. मात्र गाईचे दूध हे अमृतसारखे आहे. आपल्या अहिराणीत गाय आणि माय अशी म्हण प्रचलीत आहे.
हेच सर्व गुण दुधातही उतरतात व तेच अनुकरण मनुष्याच्याही स्वभावात दिसतात.
याच बरोबर दोन्ही दुधातील महत्वाचे घटक जाणुन घेणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून फार आवश्यक आहेत जे तुम्हाला खालील चार्ट मध्ये दिसतील.

एम्प्लॉयमेंट कार्ड नोंदणी
सरकारी व खाजगी नोकरी अर्ज करण्याकरिता एम्प्लॉयमेंट नोंदणी आवश्यक, अधिक माहिती करिता क्लिक करा

Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window)
- Click to share on LinkedIn (Opens in new window)
- Click to share on WhatsApp (Opens in new window)
- Click to email a link to a friend (Opens in new window)
- Click to share on Pinterest (Opens in new window)
- Click to share on Telegram (Opens in new window)
- Click to share on Twitter (Opens in new window)