
कोरोनाशी लढण्याची तयारी
Category : Blog , Front Page
कोरोनाशी लढण्याची तयारी
कोरोना-व्हायरसच्या प्रभावाशी निपटण्यासाठी जगभरात कंपन्या नवे नवे पर्याय अजमावत आहेत. कोरोनामुळे सर्वात जास्त नुकसान जगभरातील बिझनेसचे होते आहे, कंपन्या काम सुरु ठेवण्याचे मार्ग शोधत आहेत. कुणी कर्मचाऱ्यांना घरात काम करण्याचा सल्ला देत आहे आणि तर कुठे बँक खाते उघडण्याच्या बदल्यात मास्क फ्री देण्याची ऑफर देत आहेत. काही कंपन्या सेगमेंट बदलवून परफ्यूम ऐवजी सॅनिटायझर्स बनवण्याच्या व्यवसायात उतरले आहेत.
भारतात कंपन्यांनी काय काय केले...
- स्विगी, झोमॅटोने सुरु केली कॉन्टॅक्टलेस डिलीव्हरी
डॉमिनोज, स्विगी, झोमॅटो यांसारख्या कंपन्यांनी कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरीची सुरुवात केली आहे. डिलीव्हरी एक्सपर्ट जेव्हा ग्राहकाच्या घरी पोहोचेल तेव्हा तो ती कॅरीबॅग ग्राहकाच्या दरवाजासमोर ठेवेल आणि काही फूट मागे जाईल. तो तोपर्यंत उभा राहील, जोपर्यंत ऑर्डर ग्राहक रिसिव्ह करत नाही.
- फोर्डने कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्यास सांगितले...
अमेरिकन ऑटोमेकर कंपनी फोर्डने कोरोनामुळे भारतातील 10 हजार कर्मचाऱ्यांना गझरुन काम करण्यास सांगितले आहे. यापूर्वी व्होल्व्होनेही अशाचप्रकारची घोषणा केली आहे. आयटी कंपनी व्हिप्रोनेदेखील साेमवारी वर्क फ्रॉम होमची घोषणा केली आहे.
- एफएमसीजी कंपन्यांनी लागू केले कडक प्रोटोकॉल...
खाण्या पिण्याचे पदार्थ आणि दैनंदिन गरजांचे सामान बनवणाऱ्या एफएमसीजी कंपन्यांनी कडक प्रोटोकॉल लागू केले आहेत. हिंदुस्तान यूनीलीव्हरने सेल्स कर्मचाऱ्यांना ग्राहकांसोबत सलोखा रोखण्याचे सांगितले आहे. फॅक्टरीमध्येही कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे.
- आणीबाणीच्या परिस्थितीसाठी बनल्या विशेष टीम...
आणीबाणीच्या परिस्थितीशी लढण्यासाठी आयटीसी, गोदरेज इत्यादींनी विशेष टीम बनवली आहे. मीटिंग स्थगित करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा आधार घेतला अजात आहे. कर्मचाऱ्यांच्या रोटेशनमध्ये ड्यूटीसोबत फॅक्टरीजमध्ये आयसोलेशन यूनिट तयार केले जात आहे. हॅन्ड सॅनिटायझरला प्राधान्य दिले जात आहे.
परदेशात कंपन्यांनी कोणती पाऊले उचलली....
- परफ्यूम बनवणाऱ्या कंपन्या बनवू लागल्या सॅनिटायझर्स...
परफ्यूम बनवणाऱ्या कंपन्या हॅन्ड सॅनिटायझरच्या व्यवसायात उतरल्या आहेत. फ्रांसच्या लग्झरी गुड्स समूह एलव्हीएमएसने परफ्यूम कारखान्यांमध्ये सॅनिटायझर्स बनवायला सुरुवात केली आहे. अमेरिकेमध्ये ब्रुकलिन येथील न्यूयॉर्क डिस्टिलायजिंग कंपनी रेस्तरॉ, बारमध्ये हॅन्ड सॅनिटाझर्स उपलब्ध करून दिले आहेत.
- रम आणि वोडकाच्या कंपन्या बनवत आहेत सॅनिटायझर्स...
सायकोपॉम्प मायक्रो डिस्टिलरी वार्षिक सुमारे 15,000 लीटरचे उत्पादन करते. पण मार्चच्या सुरुवातीला कंपनीने हॅन्ड सॅनिटायझर्स बनवण्याचे काम सुरु केले आहे. कॅलिफोर्निया येथील लाइम मार्गरीटा व्हिस्की, रम, ब्रांडीचे उत्पादक आहेत. आता कंपन्या सॅनिटायझर्स बनवत आहेत.
- खाते उघडल्यास मोफत मिळत आहे फेस मास्क...
चीनच्या बँकांनी काेराेना व्हायरसच्या इफेक्टमध्ये व्यवसायात आलेली मंदी दूर करण्यासाठी एक एक अनोखा मार्ग शोधला आहे. बँक आपल्या येथे अकाउंट उघडण्याच्या बदल्यात ग्राहकांना मोफत मास्कदेत आहेत. व्हीचॅट-पे अकाउंट्सला डेबिट किंवा क्रेडिट कार्डला लिंक केल्यावर यूजरला पाच मास्क दिले जात आहेत.
- शॉपिंगचा सुरुवातीचा एक तास केवळ वयस्कर व्यक्तींसाठी...
उत्तर आयर्लंडमध्ये सुपरमार्केट्समध्ये लांबच लांब रंग लागू लागल्या होत्या. त्यामुळे सुपरमार्केट्समध्ये खरेदीसाठी वयस्करांना प्राथमिकता दिली जात आहे. बेलफास्ट स्टोअरमध्ये रोज सकाळी एक तासाचा वेळ वयस्कर लोकांसाठी रिझर्व्ह केला गेला आहे. त्यादरम्यान केवळ तेच खरेदी करू शकतात.
Share this:
- Click to share on Facebook (Opens in new window)
- Click to share on LinkedIn (Opens in new window)
- Click to share on WhatsApp (Opens in new window)
- Click to email a link to a friend (Opens in new window)
- Click to share on Pinterest (Opens in new window)
- Click to share on Telegram (Opens in new window)
- Click to share on Twitter (Opens in new window)